Pune News : महाराष्ट्र ते राजस्थानपर्यंत पसरलेले ड्रग्ज रॅकेट उध्वस्त
Pune News : पुणे: नाशिकमध्ये दाखल असलेल्या अंमली पदार्थ तस्करीच्या एका गंभीर गुन्ह्याचा तपास करताना 'अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स' (ANTF) महाराष्ट्र राज्य पथकाने थेट राजस्थान गाठून मोठी कारवाई केली आहे.
2 min read

Pune News : जोधपूर येथून तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या; ९५ लाख ६० हजार रुपये किमतीचा सुमारे १.९१ किलो मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त
Pune News : पुणे: नाशिकमध्ये दाखल असलेल्या अंमली पदार्थ तस्करीच्या एका गंभीर गुन्ह्याचा तपास करताना 'अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स' (ANTF) महाराष्ट्र राज्य पथकाने थेट राजस्थान गाठून मोठी कारवाई केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
जोधपूर येथून तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून तब्बल ९५ लाख ६० हजार रुपये किमतीचा १,९१२ ग्रॅम (सुमारे १.९१ किलो) एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे महाराष्ट्र ते राजस्थान पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटची 'बॅकवर्ड लिंक' उध्वस्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
नाशिकमधील गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहराच्या गंगापूर पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर २०२६ रोजी एनडीपीएस कायद्यानुसार ड्रग्ज तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुरुवातीला अनिकेत बाळू गांगुर्डे (वय २५), सागर काशिनाथ गांगुर्डे (वय ३२) आणि राहुल प्रल्हाद खंडारे (वय २६, सर्व रा. नाशिक) या तिघांना अटक केली होती.
त्यांच्याकडून सुमारे २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ९८.५६० ग्रॅम एम.डी. ड्रग्जचा साठा, एक ॲक्टिव्हा दुचाकी, दोन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण ३ लाख ३५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
राजस्थानमधील जोधपूरपर्यंत धागेदोरे
या गुन्ह्याचा पुढील तपास करताना पोलिसांना ड्रग्ज पुरवठ्याचे मुख्य धागेदोरे (बॅकवर्ड लिंक) राजस्थानमधील जोधपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नाशिक कृती विभाग आणि कोकण कृती विभागाच्या संयुक्त पोलीस पथकाने जोधपूर येथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपींत रफिक खान जल्ले खान (वय २३, रा. बाडमेर, राजस्थान), रोहित अशोक मेघवाल (वय २२, रा. बाडमेर, राजस्थान), शौकत अली गफूर खान (वय २६, रा. जोधपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे.
राजस्थानमधील आरोपींकडून १,९१२ ग्रॅम चकाकणारा सफेद एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ (किंमत रु. ९५,६०,०००) आणि तीन महागडे मोबाईल फोन असा एकूण ९६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आवाहन टास्क फोर्सतर्फे आवाहन
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात ड्रग्जची तस्करी, विक्री, साठवणूक आणि सेवन याविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात आहे. अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी व्हॉट्सॲप क्र. ७२१८००००७३ किंवा spadmin-antf@mahapolice.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन टास्क फोर्सतर्फे करण्यात आले आहे.


