Skip to content

Pune News : महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जाहीर

Pune News : पुणे : राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जाहीर
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जाहीर

Pune News : पुणे : राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतही पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम असून, दोन सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत सध्या तुरळक ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share