Skip to content

Mumbai news : राज्यभरात कमी दर्जाच्या व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरुद्ध मोठी कारवाई; २५.५४ लाखांचा साठा जप्त

Mumbai news :मुंबई: अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य (एफडीए) कडून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक मोठी मोहीम राबवण्यात आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

राज्यभरात कमी दर्जाच्या व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरुद्ध मोठी कारवाई; २५.५४ लाखांचा साठा जप्त
राज्यभरात कमी दर्जाच्या व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरुद्ध मोठी कारवाई; २५.५४ लाखांचा साठा जप्त

Mumbai news :मुंबई: अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य (एफडीए) कडून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. २५ आणि २६ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील विविध विभागांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवून सुमारे २५ लाख ५४ हजार रुपयांचा संशयास्पद व कमी दर्जाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली .https://maharashtramirror.com/ Mumbai news
या विशेष मोहिमेदरम्यान बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या विभागांमधील एकूण १४ प्रमुख अन्न आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये जवळपास ९,३८५ किलो अन्नपदार्थ, ७,५६६ कालबाह्य पॅकबंद नग, ७,१०४ शीतपेयांच्या बाटल्या आणि ८८ लिटर दुधाचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात मावा, विविध मिठाई, नमकीन, शेव, चिवडा, मल्टिग्रेन व भाजीपाला चिप्स, सुका मेवा, सोया चंक्स, गव्हाचे पीठ, खोबरा पावडर आणि इन्स्टंट गुलाबजामून मिक्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
विनालेबल विक्री करणे, अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांचे उत्पादन व पॅकिंग करणे, कालबाह्य झालेला साठा बाळगणे तसेच अन्नात भेसळ असल्याचा संशय असणे यांसारख्या कारणांमुळे ही कायदेशीर जप्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने सर्व अन्न व्यवसाय चालकांना अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याचा कडक इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना तिचे लेबल, पॅकिंग दिनांक आणि परवाना तपासूनच खरेदी करावी आणि काही गैरप्रकार आढळल्यास प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांकावर (१८००-२२२-३६५) तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share