Skip to content

Mumbai News : दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्र; शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Mumbai News : मुंबई - महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून आता रब्बी हंगामासमोरही पाण्याचे संकट उभे राहिले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्र; शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्र; शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


Mumbai News : मुंबई - महाराष्ट्रात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून आता रब्बी हंगामासमोरही पाण्याचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी पिके करपली असून अनेक ठिकाणी उभी पिके माना टाकल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याची उपलब्धता, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत किंवा माफी, जनावरांसाठी चारा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. मात्र खरीप हंगामाचे नुकसान झाल्यानंतर रब्बीची पेरणी कशी करायची, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. यंदा पावसाने दगा दिल्याने पिके करपली असून हजारो शेतकरी अडचणीत सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी संकटात असताना आगामी धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साधेपणाने साजरे करावेत आणि उत्सवांवरील खर्चातील काही निधी दुष्काळग्रस्त शेतकरी व पुनर्वसनासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या परिस्थितीत दुष्काळाकडे केवळ सरकारी संकट म्हणून पाहता येणार नाही. शेतकरी अडचणीत असताना समाजानेही आपली सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. उत्सव साजरे करताना अनावश्यक खर्च टाळून त्यातून गरजू शेतकरी कुटुंबांना मदत करता येऊ शकते. पाणी बचत, अन्नाची नासाडी टाळणे आणि दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरते.

दुष्काळाच्या या कठीण काळात सरकारची मदत आणि समाजाची संवेदनशीलता एकत्र आली, तर बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो. शेवटी शेतकरी वाचला तरच शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षा टिकून राहणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share