Skip to content

Mumbai news : महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली; सोयाबीन-कापूस संकटात, उसालाही मोठा फटका

Mumbai news :मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली; सोयाबीन-कापूस संकटात, उसालाही मोठा फटका
महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली; सोयाबीन-कापूस संकटात, उसालाही मोठा फटका

Mumbai news : पावसाचा प्रदीर्घ खंड; २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांत पावसाची मोठी ओढ, ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी पंचनामे


Mumbai news :मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, कडधान्यांसह विविध खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला असून काही भागांत उसाची वाढही खुंटली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या क्षेत्रातील पिके वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai news
राज्यातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत सरकारने दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय आपत्ती निधी (NDRF) निकषांनुसार दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पंचनाम्यांपूर्वीच टंचाई निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai news

८६ तालुक्यांत पावसाचा मोठा खंड


उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील २० जिल्ह्यांमधील ८६ तालुक्यांत ३० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड नोंदवला गेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील ३१, पश्चिम महाराष्ट्रातील १७, मराठवाड्यातील १६ आणि विदर्भातील २२ तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ४३ दिवसांहून अधिक काळ पाऊस न झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. काही अन्य तालुक्यांतही सुमारे ४० दिवसांचा पावसाचा खंड राहिला आहे.
राज्यात १ जून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाची सुमारे १६ टक्के तूट नोंदवली गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पावसाअभावी खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोयाबीन-कापूस वाळले; उसालाही फटका


पावसाचा खंड वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतजमिनींमध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. कडधान्य पिकांनाही मोठा फटका बसला असून काही भागांत पिके करपल्याचे चित्र आहे.
उसाच्या पिकावरही पावसाअभावी परिणाम झाला आहे. उसाची वाढ खुंटली असून नव्या लागवडीसमोरही पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

‘१०० टक्के दुष्काळ जाहीर करा’; बाबासाहेब पाटील यांची मागणी


दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रात १०० टक्के दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पावसाअभावी शेतीची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बाबासाहेब पाटील म्हणाले, “एवढा दुष्काळ मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेला नाही. कुठलीच पिके आळलेली नाहीत. सोयाबीन, कापूस गेला असून उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळ तर जाहीर होणार आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे शासन मदत करणारच आहे. दुष्काळ १०० टक्के जाहीर होणार आहे.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला पुन्हा जोर आला आहे. मात्र, राज्यात सर्वत्र १०० टक्के दुष्काळ जाहीर झाल्याचा अंतिम सरकारी निर्णय अद्याप झालेला नसून, सध्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे आणि परिस्थितीचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सरकारकडून पंचनामे; शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विविध दुष्काळग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. सरकारकडून NDRFच्या निकषांनुसार मदत आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडूनही केली जात आहे. काही विरोधी नेत्यांनी पंचनाम्यांपूर्वीच तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पीक नुकसान, पाणीटंचाई आणि पुढील हंगामाच्या नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे किती वेगाने पूर्ण होतात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणत्या मदतीची घोषणा केली जाते, याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share