Skip to content

Mumbai News : कोरडा दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना

Mumbai News : मुंबई : राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Mumbai News : मुंबई : राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीपिकांची पाहणी करत त्यांच्या अडचणी आणि स्थानिक परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिल वसुलीला तात्पुरती स्थगिती तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. राज्य सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असून, दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वीही सरकारने शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना राबवली असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेतले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आगामी काळातही राज्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत राहू, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share