Skip to content

Pune News : राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी राजधानी मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळाली.

VK
Vikrant Kulkarni

4 min read

*राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष;
*राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष;

काही ठिकाणी उत्सवाला लागले गालबोट मुंबईत २२ गोविंदा जखमी जुन्या सांगवीत लोखंडी अँगल कोसळून महिलेचा मृत्यू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी राजधानी मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळाली. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि लावणी कलाकारांच्या उपस्थितीमुळे दहीहंडीच्या ठिकाणी मनोरंजनाचीही मेजवानी मिळाली. पुण्यात नाना भानगिरे, कात्रज (अजितदादा बाबर भव्य दहीहंडी) आणि पुनित बालन यांच्यासह अनेकांकडून विविध ठिकाणी मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी केली.https://maharashtramirror.com/ Pune News

डॉल्बी-डीजेमुक्त उपक्रम
पुनीत बालन यांच्यासारख्या आयोजकांनी डॉल्बी आणि डीजेमुक्त दहीहंडीचा कौतुकास्पद उपक्रम राबवून पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन केले. पारंपरिक वाद्ये, ढोल- ताशे, हलगी- मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली. दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी डीजे न लावण्याचा घेतलेला निर्णय ही सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब ठरली.https://maharashtramirror.com/ Pune News

इव्हेंटचे स्वरूप
पुण्यात १५०० पेक्षा जास्त मंडळ आणि उच्च तंत्रज्ञान, आकर्षक रोख बक्षिसे यामुळे दहीहंडी हा एक मोठा व्यावसायिक आणि सांस्कृतिक उत्सव बनला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
शहर आणि उपनगरांमध्ये मिळून लहान-मोठी सुमारे १,५०० हून अधिक दहीहंडी मंडळे आहेत. पेठांमधील पारंपरिक आणि मानाच्या हंड्यांपासून ते उपनगरांतील राजकीय व स्थानिक नेत्यांच्या बहुचर्चित हंड्यांपर्यंत लाखोंचे बजेट आखण्यात आले.

राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील जांभोरी मैदानावरील दहीहंडी उत्सवाला भेट दिली. त्यांनी दहीहंडी फोडून उत्सवात सहभाग नोंदविला. अभिनेता रितेश देशमुखने घाटकोपरमधील दहीहंडीला उपस्थिती लावली. दहीहंडी उत्सवातील साहसी खेळ आणि गोविंदा पथकांमधील चुरस हे दरवर्षीचे आकर्षण असते. यंदा त्याला विक्रमाची जोड मिळाली आहे. मुंबई, ठाणे आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये विविध मंडळांनी गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती. उंच मानवी मनोरे आणि विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसह चित्रपट कलाकार, गायक आणि अन्य कलावंतांच्या उपस्थितीमुळे उत्सवस्थळी मोठी गर्दी दिसून आली .https://maharashtramirror.com/ Pune News

दहीहंडीतील संभाव्य दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि सरकारी रुग्णालयांनी दीडशेहून अधिक खाटा राखीव ठेवल्या होत्या. आपत्कालीन उपचार, अस्थिरोग आणि दुखापत उपचार पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले होते.

दहा थरांचा विक्रम अपूर्ण

ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात ‘आर्यन्स गोविंदा पथका’ने दहा थरांचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला. पथकाने दहा थरांची रचना केली; मात्र दहाव्या थरावरील गोविंदा पूर्णपणे उभा राहण्यापूर्वीच मनोरा कोसळला. त्यामुळे विश्वविक्रमाचा प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही.https://maharashtramirror.com/ Pune News

महिला पथकाचे सात थर

ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवात ‘शिवतेज महिला गोविंदा पथका’ने सात थरांचा मानवी मनोरा उभारला. या ठिकाणी २५ लाख रुपयांच्या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Pune News

दृष्टिहीन गोविंदांनी रचले ४ थरांचे मनोरे

दादर येथील आयडियल येथे नयन फाऊंडेशनच्या दृष्टिहीन गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभाग घेत आपल्या अफाट जिद्दीची आणि आत्मविश्वासाची प्रचिती संपूर्ण मुंबईकरांना दिली. दृष्टी नसली तरी आत्मबळ आणि एकजुटीच्या जोरावर कोणतंही आव्हान पेलता येतं, हे या गोविंदांनी आपल्या कौशल्याने सिद्ध करून दाखवलं. दृष्टिहीन मुलांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने चार थरांची सलामी दिली, तर दुसरीकडे महिला गोविंदांनीही कुठेही मागे न राहता तीन थरांचा सुरक्षित आणि मजबूत मानवी मनोरा यशस्वीरीत्या उभारला.जांभळी नाका परिसरात राजन विचारे यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकासाठी एक लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Pune News

मागाठाण्यात ‘मातृभाषा मराठीचा जागर’


बोरीवलीतील मागाठाणे येथे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाने २३ वर्षांची परंपरा पूर्ण केली. यंदाच्या उत्सवासाठी ‘मातृभाषा मराठीचा जागर’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.
डोंबिवलीतही मानाच्या दहीहंडी सोहळ्यात विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. गोविंदांचा उत्साह, मानवी मनोऱ्यांचा थरार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.


लोकलच्या महिला डब्यातही गोपाळकाला

बदलापूर-ठाणे मार्गावरील लोकलच्या महिला डब्यात प्रवासी महिलांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. डबा फुले, रंगीबेरंगी पताका, फुगे आणि छोट्या मडक्यांनी सजविण्यात आला होता. महिलांनी गाणी आणि पारंपरिक घोषणांच्या माध्यमातून कृष्णजन्माष्टमीचा आनंद साजरा केला.

उत्सवाला लागले गालबोट


मात्र काही ठिकाणी उत्सवाला गालबोटही लागल्याचे दिसून आले. मुंबई, ठाणे आणि पुण्यात गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचण्याची चुरस सुरू असतानाच मुंबईत दुपारपर्यंत २२ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील जुन्या सांगवीत दहीहंडीच्या स्टेजची कमान उतरविताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

नऊ थरांचा मनोरा उतरविताना दुर्घटना


घाटकोपरमध्ये मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात अंधेरी पूर्व येथील ‘अखिल मालपा डोंगरी’ गोविंदा पथकाने नऊ थरांचा मानवी मनोरा उभारला. यंदाच्या हंगामात मुंबईमध्ये नऊ थर रचणारे हे पहिले पथक ठरल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र, मनोरा उतरत असताना सर्वांत वरच्या गोविंदाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. संबंधित गोविंदाच्या दुखापतीचे स्वरूप आणि प्रकृतीबाबत तत्काळ माहिती उपलब्ध झाली नाही.

जुन्या सांगवीतील दुर्घटनेने महिलेचा मृत्यू


पिंपरी-चिंचवडमधील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी कार्यक्रमानंतर स्टेजची लोखंडी कमान उतरविण्याचे काम सुरू होते. त्या वेळी कमानीचा एक अँगल खाली उभ्या असलेल्या सलमा पठाण यांच्या अंगावर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ४५ वर्षीय पठाण यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे सार्वजनिक उत्सवांसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या लोखंडी संरचनांची सुरक्षितता, तांत्रिक तपासणी आणि त्या उभारणाऱ्या तसेच उतरविणाऱ्या कामगारांच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Share