Skip to content

Pune News : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

Pune News : पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

Pune News : बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून

Pune News : पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत सूचनेनुसार, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune news

बोर्डाने परीक्षेचे नियोजन विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावे आणि त्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी परीक्षेच्या संभाव्य तारखा आधीच स्पष्ट केल्या आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News

या मुख्य लेखी परीक्षांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षांच्या तारखांबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

राज्य शिक्षण मंडळाने सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच सविस्तर वेळापत्रक तपासून त्यानुसार अभ्यासाची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share