Maharashtra BMC Election : अखेर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; ठाणे, नवी मुंबई, कल्याणची प्रभाग रचना जाहीर
Maharashtra BMC Election Latest News : ‘4 नगरसेवकांचा एक प्रभाग’ या सूत्रानुसार प्रभाग रचना अंतिम
1 min read

Maharashtra BMC Election Latest News : ‘4 नगरसेवकांचा एक प्रभाग’ या सूत्रानुसार प्रभाग रचना अंतिम
मुंबई :- राज्यातील रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुका अखेर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकांचा मार्ग मोकळा करताना, राज्य सरकारने प्रारुप प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. यात ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांची प्रभाग रचनाही जाहीर झाली आहे.
ठाणे महापालिकेची स्थिती:
ठाणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थिती
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची स्थिती:
नवी मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली.
या प्रभाग रचनेमुळे आता इच्छुकांच्या आशा-आकांक्षांना पंख फुटले आहेत, पण त्याचसोबत अनेक जणांना आपला गट किंवा प्रभाग बदलल्याने नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.


