Skip to content

Mumbai News : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागातील १४,४४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुढाकार

Mumbai News : मुंबई : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विभागातील सुमारे १४ हजार ४४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागातील १४,४४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुढाकार
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागातील १४,४४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुढाकार

Mumbai News : मुंबई : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विभागातील सुमारे १४ हजार ४४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सुमारे साडेचार कोटी रुपये निधी जमा होण्याची अपेक्षा आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

Indian farmer at the chickpea field, farmer showing chickpea plant

सरकारकडून आवाहन होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने स्पष्ट केले आहे. महासंघाशी संलग्न विविध तांत्रिक अधिकारी व कर्मचारी संघटनांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनातून स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन कपात करून ते मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, तसेच संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कृषी विभागातील एकूण १८ हजार ६२२ मंजूर पदांपैकी तांत्रिक संवर्गातील १४ हजार ४४५ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा सामूहिक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share