Pune Crime : लोहगावात रिक्षाचालकावर हल्ला; एकाला अटक
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये सीएनजी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४९ वर्षीय रिक्षाचालकाला शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली.
1 min read

Pune Crime : सीएनजी भरण्याच्या वादातून घडला प्रकार
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये सीएनजी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४९ वर्षीय रिक्षाचालकाला शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. या हल्ल्यात रिक्षाचालकाच्या गालाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी सुहास मारुती पालवे (वय २६, रा. वैष्णवी पार्क, गाडे वस्ती, बी.जे.एस. कॉलेजजवळ, वाघोली) याला अटक केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
याप्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५ आणि आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १७) सकाळी साडेनऊच्या सुमारास वाघोली रोडवरील खांदवे पेट्रोल पंपावर ही घटना घडली. फिर्यादी त्यांची ऑटो रिक्षा सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभी करून थांबले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या रिक्षाच्या चालकासोबत सीएनजी भरण्यावरून वाद झाला. या वादादरम्यान आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी हत्याराने त्यांच्या गालावर मारून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर लोहगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.


