Skip to content

शिरगाव येथे पावणे तीन लाखांचे दारूचे रसायन नष्ट

गुन्हा नोंदवलेली महिला फरार

PG
Prashik Ghaste

1 min read

शिरगाव येथे पावणे तीन लाखांचे दारूचे रसायन नष्ट

गुन्हा नोंदवलेली महिला फरार

पिंपरी: शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू तयार करण्याचा प्रयत्न शिरगाव पोलिसांनी हाणून पाडला. ही कारवाई रविवारी (३ मे) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल चितारे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून ती सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पवना नदीच्या पात्राजवळ बेकायदेशीरपणे ८ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन दारू तयार करण्यासाठी भिजत घातले होते. जप्त केलेल्या या रसायनाची एकूण किंमत २ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. पोलीस पथक येताच महिला आरोपी तेथून पळून गेली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

Share