Lasalgone News : लासलगावात शेतकऱ्यांनी कांदा एक्सप्रेस अडवली
Lasalgone News : लासलगाव : कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
1 min read

Lasalgone News : दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकऱ्यांचा विरोध
Lasalgone News : लासलगाव : कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावर कांदा एक्सप्रेस रोखल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. https://maharashtramirror.com/ Lasalgone News
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दिल्लीसह अन्य बाजारपेठांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लासलगावहून दिल्लीला सुमारे ८४० टन कांदा पाठवण्याचे नियोजन असून त्यासाठी २१ वॅगनची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक बाजारातील कांद्याच्या दरावर दबाव येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला पाठवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. ग्राहकांना स्वस्त कांदा देताना उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणेही आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटनांनी दिला आहे. त्यामुळे लासलगावमधील कांदा एक्सप्रेसचा मुद्दा आता अधिक चिघळण्याची शक्यता असून, सरकार यावर काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


