Skip to content

Mumbai news : २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप

Mumbai news :मुंबई, महाराष्ट्र मिरर : मुंबईतील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘लालबागच्या राजा’ला शनिवारी सकाळी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

२२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप गिरगाव चौपाटीवर भक्तिभावाने विसर्जन; ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने मुंबई दुमदुमली
२२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप गिरगाव चौपाटीवर भक्तिभावाने विसर्जन; ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने मुंबई दुमदुमली

Mumbai news : गिरगाव चौपाटीवर भक्तिभावाने विसर्जन; ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने मुंबई दुमदुमली

Mumbai news :मुंबई, महाराष्ट्र मिरर : मुंबईतील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘लालबागच्या राजा’ला शनिवारी सकाळी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. तब्बल २२ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर सकाळी सातच्या सुमारास राजाचे गिरगाव चौपाटीवर आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात अरबी समुद्रात मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मंडपातून सुरू झाली होती. राजा मंडपाबाहेर पडताच दर्शनासाठी जमलेल्या भाविकांनी पुष्पवृष्टी करत बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणरायाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. लालबागमधून निघालेली मिरवणूक भारतमाता, करी रोड, भायखळा, नागपाडा, दोन टाकी आणि ऑपेरा हाऊस परिसरातून गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक तासन्‌तास थांबले होते.https://maharashtramirror.com/ Mumbai news

गिरगाव चौपाटीवर पारंपरिक महाआरती

शनिवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर विसर्जनाची पुढील प्रक्रिया सुरू झाली. समुद्रकिनारी पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली. त्यानंतर मूर्तीवरील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले.

विशेष तराफ्यावरून समुद्रात नेली मूर्ती

आरती आणि औक्षणानंतर लालबागच्या राजाची भव्य मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तराफ्यावर ठेवण्यात आली. स्थानिक कोळी बांधवांनीही परंपरेनुसार विसर्जन प्रक्रियेत सहभाग घेतला. तराफ्याच्या मदतीने मूर्ती समुद्रात खोलवर नेण्यात आली आणि भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाची मूर्ती समुद्रात विलीन होत असताना चौपाटीवर उपस्थित भाविक भावूक झाले. २२ तासांच्या मिरवणुकीची सांगता ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात झाली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share