Mumbai News : लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात
Mumbai News : मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.
1 min read

सरकारकडून बहिणींना रक्षाबंधनाची भेट
Mumbai News : मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. रक्षाबंधननिमित्त महायुती सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना विशेष भेट देण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलं आहे. त्यानुसार काही पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असून, पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.


