Skip to content

Korba News : रील्स पाहताना इंटरनेट बंद पडले; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Korba news कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात इंटरनेट वारंवार बंद पडल्याने त्रस्त झालेल्या ५२ वर्षीय महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

रील्स पाहताना इंटरनेट बंद पडले; महिलेने उचलले टोकाचे पाऊल मोबाइल आपटल्यानंतर कीटकनाशक प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू
रील्स पाहताना इंटरनेट बंद पडले; महिलेने उचलले टोकाचे पाऊल मोबाइल आपटल्यानंतर कीटकनाशक प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू

Korba News : मोबाइल आपटल्यानंतर कीटकनाशक प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू

Korba news कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात इंटरनेट वारंवार बंद पडल्याने त्रस्त झालेल्या ५२ वर्षीय महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंग्लो बाई सारथी असे मृत महिलेचे नाव असून त्या केराकछार गावातील रहिवासी होत्या.https://maharashtramirror.com/ Korba News

पोलिसांच्या माहितीनुसार, मंग्लो बाई यांना मोबाइलवर रील्स पाहण्याची सवय होती. शनिवारी रील्स पाहत असताना इंटरनेट वारंवार खंडित झाल्याने त्या संतापल्या. रागाच्या भरात त्यांनी मोबाइल जमिनीवर आपटून तो खराब केला. त्यानंतर घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले.https://maharashtramirror.com/ korba news

प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या १७ वर्षीय मुलीच्या लक्षात हा प्रकार आला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने करतला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोरबा मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.https://maharashtramirror.com/ korba news

या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मोबाइल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत वाढती चिंता व्यक्त होत असताना, इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या त्रासातून घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share