Skip to content

Pune crime : ग्राहकांचे २ लाख ९१ हजार उकळून शोरूमची फसवणूक

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गाड्यांच्या बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून रोख आणि ऑनलाईन पैसे स्वीकारून शोरूमच्या खात्यावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

3 min read

ग्राहकांचे २ लाख ९१ हजार उकळून शोरूमची फसवणूक सेल्स एक्झिक्युटिव्ह विरोधात गुन्हा दाखल
ग्राहकांचे २ लाख ९१ हजार उकळून शोरूमची फसवणूक सेल्स एक्झिक्युटिव्ह विरोधात गुन्हा दाखल

Pune crime : सेल्स एक्झिक्युटिव्ह विरोधात गुन्हा दाखल

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गाड्यांच्या बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून रोख आणि ऑनलाईन पैसे स्वीकारून शोरूमच्या खात्यावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना डिसेंबर २०२५ ते मे २०२६ दरम्यान किवळे येथील सम्राट ऑटोमोबाईलच्या आऊटलेटमध्ये घडली.https://maharashtramirror.com/ Pune crime

या प्रकरणात ५५ वर्षीय महिला सेल्स मॅनेजर (रा. चिंचवड गाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर सुधाकर बागडे (४१, रा. संगमवाडी, शिवाजीनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

आरोपी किशोर बागडे हा सम्राट ऑटोमोबाईलच्या किवळे आऊटलेटमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कामास होता. त्याने ग्राहकांकडून गाड्या बुकिंगच्या नावाखाली रोख व ऑनलाईन पद्धतीने एकूण २ लाख ९१ हजार ८०० रुपये स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर स्वीकारले. ही रक्कम शोरूमच्या खात्यावर जमा न करता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्राहक आणि शोरूमची फसवणूक केली असा आरोप आहे.
देहूरोड पोलीस तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime


ॲम्ब्युलन्सच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी

अनोळखी ॲम्ब्युलन्स चालकाविरुद्ध गुन्हा

पिंपरी : कामावर जाणाऱ्या एका सायकलस्वाराला भरधाव ॲम्ब्युलन्सने समोरून जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (६ सप्टेंबर) सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास स्पाईन रोडवरील जाधव सरकार चौक, चिखली येथे घडली.

लक्ष्मण नथुजी साह (५६, रा. जाधववाडी, चिखली, मूळ रा. बिहार) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी ॲम्ब्युलन्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे आपल्या राहत्या घरातून सायकलवरून टाटा मोटार कंपनीत कामावर जात होते. ते जाधव सरकार चौकात आले असता समोरून आलेल्या एका भरधाव ॲम्ब्युलन्सच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सायकलला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलचे नुकसान झाले असून फिर्यादीच्या उजव्या पायाला फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस तपास करत आहेत.


दीड ते दोन वर्षांच्या बालिकेला उघड्यावर सोडून पालक पसार

भंडारा डोंगर परिसरातील घटना

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : आपल्या दीड ते दोन वर्षांच्या बालिकेचा सांभाळ न करता तिला उघड्यावर सोडून देऊन पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी (६ सप्टेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुदवडी हद्दीतील श्री संत तुकाराम महाराज मंदिर, भंडारा डोंगर येथे घडली.

पोलीस शिपाई सिद्धू पवार यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात पालकांनी त्यांच्या दीड ते दोन वर्षे वयाच्या बालिकेच्या देखभालीची जबाबदारी असतानाही तिचे पालनपोषण न करता क्रूरतेची वागणूक दिली. त्या चिमुकलीला भंडारा डोंगर परिसरात उघड्यावर सोडून देऊन तिचा परित्याग करण्यात आला. याप्रकरणी बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


पॉपी स्ट्रॉ वाहतूक प्रकरणी तरुणास अटक

गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : दुचाकीवरून बेकायदेशीरपणे अफूच्या सुकवलेल्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला अमलीपदार्थ विरोधी कारवाईत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (७ सप्टेंबर) दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास एच. पी. पेट्रोल पंपासमोर, ताथवडे येथे करण्यात आली.

पोलीस शिपाई अमर राणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेवतराम घेवरराम चौधरी (२५, रा. ताथवडे, मूळ रा. नागौर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने डांगे चौकाकडून रावेतकडे जाणाऱ्या मार्गावर संशयित आरोपीला थांबवले. त्याच्या ताब्यातील हिरो होंडा सीडी १०० दुचाकीची झडती घेतली असता, त्याच्याकडे १३ हजार ३०५ रुपये किमतीचा ८८७ ग्रॅम वजनाचा पॉपी स्ट्रॉ हा अमलीपदार्थ बेकायदेशीरपणे बाळगल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून वाकड पोलीस तपास करत आहेत.


बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बेकायदेशीरपणे तलवार आणि कोयता बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (७ सप्टेंबर) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास विद्यानगर, पिंपरी येथील हनुमान मंदिरासमोर करण्यात आली.

प्रेम कृष्णा मोरे (१९, रा. निगडी प्राधिकरण) याला अटक करण्यात आली असून, त्याला शस्त्रे पुरवणारे रोहन माने (विद्यानगर, चिंचवड) आणि रिहान शेख यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल दीपक तांदळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी प्रेम मोरे हा लोखंडी तलवार आणि कोयता अशी घातक हत्यारे बाळगताना आढळला. रोहन माने आणि रिहान शेख यांनी ही हत्यारे त्याला पुरवली होती. या प्रकरणी पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Share