Pune News : खराडीत घरातून सुमारे २५ लाखांचे दागिने चोरीला
Pune News :पुणे : खराडीतील एका घरातून २४ लाख ८६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे.
1 min read

Pune News : घरकाम करणाऱ्या दोघांविरुद्ध तक्रार
Pune News :पुणे : खराडीतील एका घरातून २४ लाख ८६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. घरकाम करणाऱ्या दोघांनी हे दागिने चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी खराडीतील ६३ वर्षीय व्यक्तीने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३०६, ३१६(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
तक्रारीनुसार, पुणे–नगर रस्त्यावरील पाराशर सोसायटीतील त्यांच्या घरी १ डिसेंबर २०२५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादीने घरातील शयनकक्षातील बेडमध्ये एका बॅगेतील बॉक्समध्ये सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते. घरकाम करणाऱ्या दोघांनी ते चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे तपास करीत आहेत.


