Mumbai News : खारमध्ये सहा बांगलादेशी नागरिक ताब्यात
Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : भारतात अवैधरीत्या वास्तव्य केल्याच्या संशयावरून खार पोलिसांनी सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
2 min read

Mumbai News : आरोपीच्या मोबाईलमध्ये 40 ओळखपत्रांचे फोटो; घरझडतीत 20 संशयित आधार कार्डे, बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा तपास
Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : भारतात अवैधरीत्या वास्तव्य केल्याच्या संशयावरून खार पोलिसांनी सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. कागदपत्रे आणि ओळखीची पडताळणी केल्यानंतर ते बांगलादेशी नागरिक असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या मोबाईलमध्ये विविध व्यक्तींच्या नावावरील 40 आधार, पॅन आणि इतर ओळखपत्रांचे फोटो आढळले आहेत. घरझडतीत आणखी 20 संशयित अथवा बनावट आधार कार्डे जप्त करण्यात आली असून, बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून देणाऱ्या रॅकेटचा तपास सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
खार पोलिसांनी 29 सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. इकबाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनिल दत्ता (वय 35), राणा मोल्ला इमदादुल मोल्ला ऊर्फ राणा शाह (20), समीम मिझानूर सरदार ऊर्फ राजू नरेंद्र (25), मोसमद मुंजिला खातून ऊर्फ सिला सरदार ऊर्फ रिया दत्ता (23), माफुजा अख्तर लिमा मो. हाशम काझी ऊर्फ कविता शाह (25) आणि हलीमा अख्तर मो. झिल्लू खान ऊर्फ मोनिका दत्ता (26) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
भारतात आणण्यासाठी मदत केल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान इकबाल शेख याने बांगलादेशातून व्यक्तींना भारतात आणण्यासाठी मदत केल्याचे तसेच त्यांच्यासाठी ओळखपत्रे, रेल्वे प्रवास, राहण्याची जागा आणि रोजगाराची व्यवस्था करण्यात मदत केल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1645/2026 अंतर्गत इमीग्रेशन आणि परदेशी कायदा, 2025 मधील कलम 24 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मोबाईलमध्ये ओळखपत्रांचे फोटो, QR कोड
अटक आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता विविध व्यक्तींच्या नावाने असलेल्या 40 आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रांचे फोटो आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय महिलांची छायाचित्रे, QR कोड, रेल्वे प्रवासाची तिकिटे आणि अन्य डिजिटल माहितीही मिळाली आहे.
आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर बांगलादेशातील ‘बांग्लालिंक’ कंपनीचे एक सिमकार्ड आणि विविध व्यक्तींच्या नावावरील 20 संशयित अथवा बनावट आधार कार्डे जप्त करण्यात आली आहेत. ही आधार कार्डे खरी आहेत की बनावट, तसेच ती कोणत्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आली, याची संबंधित प्राधिकरणाकडून पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
एजंट आणि मध्यस्थांचा शोध
बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून देणारे, बांगलादेशातून भारतात अवैधरीत्या येण्यासाठी मदत करणारे मध्यस्थ किंवा एजंट तसेच प्रवास, निवास आणि रोजगाराची व्यवस्था करणाऱ्या अन्य व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आहे का, याचा खार पोलीस तपास करत आहेत.


