Skip to content

Pune News : खडकवासल्यात दुचाकी-चारचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : खडकवासला येथील आयएटी परिसरात शुक्रवारी (दि.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

खडकवासल्यात दुचाकी-चारचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी
खडकवासल्यात दुचाकी-चारचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

Pune News : अपघातातील लहान मूल सुखरूप

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : खडकवासला येथील आयएटी परिसरात शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) दुचाकी आणि चारचाकी वाहनाची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जीवन उदय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातावेळी त्यांच्यासोबत असलेले लहान मूल सुखरूप असून, त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. https://maharashtramirror.com/ Pune News

अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाचे गणेश सपकाळ यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कीरकटवाडी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी गणेश कसबे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कसबे यांनी तातडीने बीट मार्शलला घटनास्थळी रवाना केले.घटनास्थळी पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. गंभीर जखमी झालेल्या महिला आणि पुरुषाला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News

या अपघातात लहान मूल कोणतीही दुखापत न होता सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक तपशील समोर आलेला नाही.

Share