Ketan Agarwal Siya Goyal News : लोहगड हत्या प्रकरण : आरोपी सिया गोयलकडून घटनास्थळाची पुनर्रचना; 'त्या' क्षणांचा पोलिसांनी घेतला मागोवा
पुणे, महाराष्ट्र मिरर : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल (वय २५) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी सकाळी आरोपी सिया गोयल हिला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेची पुनर्रचना (क्राईम सीन रिक्रिएशन) केली.
1 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल (वय २५) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी सकाळी आरोपी सिया गोयल हिला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेची पुनर्रचना (क्राईम सीन रिक्रिएशन) केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत सियाकडून घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. या वेळी मृत केतन अग्रवाल याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डमीचा वापर करण्यात आला. Ketan Agarwal Siya Goyal News :

तपास पथकाने सियाला लोहगडावर पोहोचल्यानंतरचा मार्ग, दोघांनी चालत गेलेली पायवाट, केतनला कथितरित्या कड्यावरून ढकलण्यात आलेले अचूक ठिकाण तसेच घटनेपूर्वी आणि त्यानंतर घडलेल्या हालचाली दाखविण्यास सांगितले. तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या जबाबांची प्रत्यक्ष घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य भौतिक पुराव्यांशी सांगड घालण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन चौधरी याचीही स्वतंत्रपणे घटनास्थळी नेऊन पुनर्रचना केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना २३ जून रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Ketan Agarwal Siya Goyal News :
पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवाल यांना कड्यावरून ढकलण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी पूर्वनियोजित सांकेतिक इशाऱ्याद्वारे एकमेकांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला आहे. हा इशारा दोघांमध्ये आधीपासूनच कट रचण्यात आल्याचा महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या असून, बाली येथे होणाऱ्या प्री-वेडिंग शूटचा बेत हाणून पाडण्यासाठी सियाने केतनचा पासपोर्ट चोरून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील एका विश्रांतीस्थळी फेकून दिल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. तसेच ३१ मे आणि १४ जून रोजीही सियाने केतनला लोहगडावर नेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ४ जून रोजीही लोहगडावर जाण्याचा आग्रह सियाने धरला होता, मात्र केतनच्या आईने परवानगी नाकारल्याने तो बेत रद्द झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.
या प्रकरणातील सर्व तांत्रिक व भौतिक पुरावे न्यायालयात भक्कमपणे मांडता यावेत, तसेच आरोपींच्या जबाबातील विसंगती आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पुनर्रचना महत्त्वाची ठरणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.


