Skip to content

Pune News : भूयारी मेट्रो कामामुळे कात्रज चौकात वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी

Pune News :पुणे: स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गावरील कात्रज मेट्रो स्थानकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

भूयारी मेट्रो कामामुळे कात्रज चौकात वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
भूयारी मेट्रो कामामुळे कात्रज चौकात वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी

Pune News :पुणे: स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गावरील कात्रज मेट्रो स्थानकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कात्रज चौकात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांतर्फे शनिवार, १७ ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार सातारा, सोलापूर, सासवड आणि मुंबईच्या दिशेने कात्रज चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांवर विविध प्रमुख टप्प्यांवर बंदी घालण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार, नागरिक व वाहनधारकांनी कात्रज चौकात होणारी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.https://maharashtramirror.com/ Pune News

विविध मार्गांवरील बंदी व नाकेबंदी
मेट्रोच्या कामासाठी मुख्य रस्त्याचा भाग वापरला जाणार असल्याने अवजड वाहनांना जुन्या कात्रज बोगद्यामार्गे येणारी जड वाहने शिंदेवाडी पुलाजवळ रोखली जातील. तर नवीन बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना नवले पुलाजवळ प्रवेशबंदी असेल. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गाने वारजे भागातून कात्रजकडे येणाऱ्या अवजड वाहनांना नवले पुलाच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मंतरवाडीमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना मंतरवाडी चौकातच थांबवले जाईल. तर बोपदेव घाटातून कात्रज-कोंढवा रस्त्याकडे येणाऱ्या जड वाहनांवर खडी मशिन चौकात निर्बंध लादण्यात आले आहेत.

बस व इतर वाहनांसाठी सूचना
मुंबईकडून येणाऱ्या सर्व खाजगी व एसटी बसवर नवले पुलाजवळ निर्बंध असतील. तसेच सातारा बाजूकडून येणाऱ्या बसला नवले पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन पुढे जावे लागेल. याशिवाय वाहतुकीचा वेग कायम ठेवण्यासाठी वंडर सिटी ते कात्रज बायपास, मोरेबाग आणि जुना बोगदा मार्ग या दोन्ही बाजूंना 'नो पार्किंग' क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग
वाहनचालकांनी नवले पूल- नवीन कात्रज बोगदा- खेड शिवापूर-सासवड लिंक रस्ता- वडकी- मंतरवाडी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच, नवले पूल- नवीन कात्रज बोगदा- खेड शिवापूर- सासवड लिंक रस्ता- गरदे- भिवरी- बोपदेव घाट- येवलेवाडी- पिसोळी- मंतरवाडी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share