Skip to content

Kashmira Police News : 'पप्पू पेजर' अखेर गळाला! काशिमीरा गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक

Kashmira Police Arrested Papu Pajor : अडीच वर्षांनंतर अटकेत असलेला कुख्यात गुन्हेगार; परदेशातून परतताच गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुसक्या आवळल्या

V
Vivek

2 min read

Kashmira Police News : 'पप्पू पेजर' अखेर गळाला! काशिमीरा गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक

Kashmira Police Arrested Papu Pajor : अडीच वर्षांनंतर अटकेत असलेला कुख्यात गुन्हेगार; परदेशातून परतताच गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुसक्या आवळल्या

मीरा-भाईंदर :- काशिमीरा येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि गेली अडीच वर्षे फरार असलेला कुख्यात गुन्हेगार निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजर याच्या मुसक्या आवळण्यात मीरा-भाईंदर गुन्हे शाखेला Kashmira Crime Branch मोठे यश आले आहे. 11 मार्च रोजी तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले होते?

13 ऑक्टोबर 2023 रोजी काशिमीरा येथील 'इंटरनॅशनल बेकिंग कंपनी'मध्ये हा थरार घडला होता. दुकानमालक चंद्रकांत कोंडगुले हे कामात व्यस्त असताना, निसार अहमद फजल अहमद शेख उर्फ पप्पू पेजरने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने मोठा अनर्थ टळला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान हा गुन्हा एका संघटित गुन्हेगारी टोळीने रचलेला कट असल्याचे स्पष्ट झाल्याने, पोलिसांनी यात 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कलमे लावली होती. Kashmira Police Latest News

परदेशात पळून जाऊनही सुटका नाही

गुन्हा घडल्यानंतर पप्पू पेजर तातडीने देश सोडून परदेशात पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. 11 मार्च 2026 रोजी तो विमानाने मुंबईत परतणार असल्याची पक्की बातमी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला आणि तो विमानतळाबाहेर पडताच त्याला अटक केली.

आरोपीवर गुन्ह्यांची मोठी मालिका

पप्पू पेजर हा केवळ काशिमीरा प्रकरणातील आरोपी नसून तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वडाळा ट्रक टर्मिनल, भायखळा आणि काशिमीरा पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 20 मार्च 2026 पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता मीरा-भाईंदर-वसई-विरार (मि.भा.व.वि.) गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस पथकाची धडक कामगिरी

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने केली. प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या फरार गुन्हेगाराला गजाआड केले आहे.

Share