Skip to content

Pune News : तडे गेले, पिलर खचले; भाजप नगरसेविकेसह स्थानिक नागरिकांचा संताप

Pune News : पुणे : कर्वेनगर ते वारजे या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेला उड्डाणपूल सध्या नागरिकांच्या जिवावर उठला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

तडे गेले, पिलर खचले; भाजप नगरसेविकेसह स्थानिक नागरिकांचा संताप राष्ट्रवादीच्या काळातील चुकीच्या आखणीमुळे कर्वे नगर उड्डाणपूल बनलाय 'मृत्यूचा सापळा'
तडे गेले, पिलर खचले; भाजप नगरसेविकेसह स्थानिक नागरिकांचा संताप राष्ट्रवादीच्या काळातील चुकीच्या आखणीमुळे कर्वे नगर उड्डाणपूल बनलाय 'मृत्यूचा सापळा'

Pune News : राष्ट्रवादीच्या काळातील चुकीच्या आखणीमुळे कर्वे नगर उड्डाणपूल बनलाय 'मृत्यूचा सापळा'

धनश्री ओतारी

Pune News : पुणे : कर्वेनगर ते वारजे या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेला उड्डाणपूल सध्या नागरिकांच्या जिवावर उठला आहे. बांधकामातील प्रचंड त्रुटी, खचलेले पिलर आणि पुलाला पडलेले तडे यामुळे हा पूल प्रवाशांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनल्याचे उघड झाले आहे. हा संपूर्ण उड्डाणपूल तत्काळ पाडून त्या ठिकाणी वनदेवी मंदिर ते वारजे ब्रिजदरम्यान नव्याने आधुनिक 'डबल डेकर' (दुमजली) उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी आक्रमक मागणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेविकेसह परिसरातील संतप्त नागरिकांनी केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

वरवरची डागडुजी म्हणजे 'लाली-लिपस्टिक' लावण्याचा प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता असताना या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. तब्बल ६ वर्षे रखडलेले हे काम पूर्ण झाल्यानंतरही वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या पुलाची मूळ आखणीच पूर्णपणे चुकीची आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

पुलाच्या संरचनेत गंभीर त्रुटी निर्माण झाल्या असून काही ठिकाणी पिलर खचले आहेत, तर स्लॅबला मोठे तडे गेले आहेत. यापूर्वी जेव्हा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, तेव्हा महापालिकेच्या पथकाने केवळ वरवरचे मलमपट्टीचे काम केले. "महापालिकेने केलेली डागडुजी म्हणजे उड्डाणपुलाला वरून लाली-लिपस्टिक लावल्यासारखा प्रकार आहे. मूळ धोका कायम असताना केवळ प्रशासकीय खापर लपवण्याचा हा प्रयत्न आहे," अशा शब्दांत नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

साईबाबा मंदिरासमोरील चौक बनला 'ब्लॅक स्पॉट'

उड्डाणपुलाचे पिलर चुकीच्या ठिकाणी उभारल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः साईबाबा मंदिरासमोरील चौक हा आता अपघातांचा मुख्य केंद्रबिंदू (ब्लॅक स्पॉट) ठरत आहे. कर्वेनगर चौकात चार महत्त्वाचे मार्ग एकत्रित येतात वारजे आणि डेक्कन कडून येणारा रस्ता, कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज कडून येणारा रस्ता, राजाराम पुला कडून येणारा मार्ग, विकास मित्र मंडळ चौक जोडणारा रस्ता, हे चारही मार्ग काही मीटरच्या अंतरावर एकत्र येत असल्याने उड्डाणपूल असूनही या चौकात २४ तास भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळते.

साधे दिशादर्शक अन् कॅट-आयही गायब

नागरिकांच्या सुरक्षेशी महापालिका प्रशासन कसा खेळ मांडत आहे, याचे भीषण चित्र येथे पाहायला मिळते. या पुलावर आणि जोड रस्त्यांवर कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग आखलेले नाही. रस्त्याच्या कडेला रात्री चमकणारे कॅट-आय किंवा पांढरे पट्टे मारलेले नाहीत.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात वारंवार महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या पत्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यातच भर म्हणजे, उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत होत असलेल्या बेकायदेशीर आणि मनमानी पार्किंगमुळे खालील रस्त्यावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

"हा उड्डाणपूल बांधल्यापासून नागरिक दररोज आपला जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत. चुकीच्या नियोजनामुळे हा पूल निष्पाप प्रवाशांचा बळी घेत आहे. महापालिकेने हा धोकादायक पूल त्वरित पाडून वनदेवी मंदिर ते वारजे ब्रिज असा थेट दुमजली (डबल डेकर) उड्डाणपूल उभारावा, जेणेकरून चौकातील सर्व रस्ते सुरळीत होतील."

  • रेश्मा बराटे, स्थानिक नगरसेविका (भाजप)
  • स्थानिक रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर महापालिकेने तात्काळ या धोकादायक पुलावर कारवाई करून नव्या दुमजली उड्डाणपुलाची घोषणा केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रशासन आता एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

    ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

    Share