Skip to content

Thane News : कल्याणमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक

Thane News : ठाणे, महाराष्ट्र मिरर : कल्याण पश्चिमेतील अन्नपूर्णा गेस्ट हाऊस येथे वेश्या व्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करून ग्राहकांना पुरविणाऱ्या दोन पुरुष दलालांना ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अटक केली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

कल्याणमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक
कल्याणमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक

Thane News : अन्नपूर्णा गेस्ट हाऊसवर गुन्हे शाखेचा छापा; १५ पीडित महिलांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Thane News : ठाणे, महाराष्ट्र मिरर : कल्याण पश्चिमेतील अन्नपूर्णा गेस्ट हाऊस येथे वेश्या व्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करून ग्राहकांना पुरविणाऱ्या दोन पुरुष दलालांना ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अटक केली. या कारवाईत १५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Thane News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरातील अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमध्ये लॉज मॅनेजर आणि वेटर महिलांना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांना लैंगिक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तपास पथकाला मिळाली होती. महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्यामार्फत मिळणाऱ्या उत्पन्नावर आरोपी उपजीविका करीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी पोलिसांनी अन्नपूर्णा गेस्ट हाऊस येथे सापळा रचला. या कारवाईदरम्यान दोन पुरुष दलालांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात २३ ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(१), १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन अन्य आरोपीही पाहिजे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या तपास पथकाने केली. या मोहिमेत तपास अधिकारी अंजली आंधळे, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसह गुन्हे शाखेच्या सी.पी.यू. पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share