Pune Crime : ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून लुटले; तीन अनोळखी भामट्यांनी हातचलाखीने पळविले २ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद बायपास परिसरात तीन अनोळखी व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले.
1 min read

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद बायपास परिसरात तीन अनोळखी व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास पुणे-नाशिक रस्त्यालगत घडली. या प्रकारात २ लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले.https://maharashtramirror.com/Pune Crime
राजकुमार बाबुराव चिमटे (वय ६६, रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९, २०४ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/Pune Crime
फिर्यादीनुसार, वडगाव आनंद बायपासजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून त्यांना थांबवले आणि बोलण्यात गुंतवले. त्यानंतर हातचलाखीने फिर्यादीकडील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि च्या त्यांच्या हातात दगड बांधलेली पांढऱ्या रंगाची पुडी दिली आणि मोटारसायकलवरून पुण्याच्या दिशेने विरुद्ध बाजूने पळ काढला. चोरीला गेलेल्या ऐवजात दोन तोळे वजनाची सोन्याची चेन आणि प्रत्येकी १३ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ८९ हजार रुपये आहे. तीनही आरोपी अनोळखी असून, पुढील तपास पोलीस हवालदार कोकणे करीत आहेत.


