Skip to content

Junnar News : औषध फवारणीसाठी शेतावर जात असताना मेटांगळे परिसरात बिबट्याचा अचानक हल्ला

Junnar News : बोरी बुद्रुक (ता.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

औषध फवारणीसाठी शेतावर जात असताना मेटांगळे परिसरात बिबट्याचा अचानक हल्ला; मोटारसायकलवरून पडल्याने शेतकऱ्याच्या पायाला दुखापत
औषध फवारणीसाठी शेतावर जात असताना मेटांगळे परिसरात बिबट्याचा अचानक हल्ला; मोटारसायकलवरून पडल्याने शेतकऱ्याच्या पायाला दुखापत

Junnar News : मोटारसायकलवरून पडल्याने शेतकऱ्याच्या पायाला दुखापत

Junnar News : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) : येथील मेटांगळे मळा परिसरात शेतावर औषध फवारणीसाठी जात असलेल्या शेतकरी दाम्पत्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दत्तात्रय बाळाजी शिंदे हे थोडक्यात बचावले. मात्र, बिबट्याच्या झेपेमुळे मोटारसायकलचा तोल गेल्याने ते खाली पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली.https://maharashtramirror.com/ Junnar News

मिळालेल्या माहितीनुसार, मेटांगळे मळा येथे राहणारे दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पत्नी विद्या शिंदे हे मोटारसायकलवरून शेतात औषध फवारणी करण्यासाठी पंप घेऊन जात होते. मळ्यातील रस्त्यावरून जात असताना रस्त्यालगतच्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि त्याने शिंदे दाम्पत्याच्या दिशेने झेप घेतली.https://maharashtramirror.com/ Junnar News

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दत्तात्रय शिंदे यांचा तोल गेला आणि ते मोटारसायकलवरून खाली पडले. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. हल्ल्यावेळी त्यांच्या जवळ असलेल्या औषध फवारणीच्या पंपामुळे बिबट्याला अडथळा निर्माण झाला. यामुळे बिबट्याला हल्ला करता आला नाही आणि शिंदे थोडक्यात बचावले. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी राजुरी येथील गोंधळे मळा परिसरात पाणी भरण्यासाठी गेलेल्या महेंद्र सखाराम हाडवळे यांच्यासमोर अचानक बिबट्या आल्याची घटना घडली होती. अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे हाडवळे यांची काही क्षणांसाठी भंबेरी उडाली होती.https://maharashtramirror.com/ Junnar News

सलग घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Share