Skip to content

25 जून : आणीबाणीच्या स्मृती जाग्या; ‘संविधान हत्या’ की ‘दुहेरी भूमिका’?

लोकशाही वाचवण्याच्या नावावर कारवाया झाल्या, की सत्तेसाठीच संविधानाचा वापर?

V
Vivek

1 min read

25 जून : आणीबाणीच्या स्मृती जाग्या; ‘संविधान हत्या’ की ‘दुहेरी भूमिका’?

लोकशाही वाचवण्याच्या नावावर कारवाया झाल्या, की सत्तेसाठीच संविधानाचा वापर? राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

मुंबई | 25 जून 1975 — भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादग्रस्त टप्पा. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. आज त्याला 50 वर्ष पूर्ण होत असल्याने पुन्हा एकदा त्या काळाच्या आठवणींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

भाजपने आजचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळला असून, इंदिरा गांधींच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात म्हणले, *“लोकशाही संपवण्याचा तो प्रयत्न होता. संविधानात बदल करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न उध्वस्त करण्यात आले.”

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणीबाणीला ‘काळा दिवस’ संबोधले. “सत्तेच्या लालसेसाठी विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. रस्त्यावर उतरलेल्या जनतेला गजाआड केले गेले,”* असे ते म्हणाले.

50 वर्षांनंतरही देशात आणीबाणीचा वाद पेटलेला; भाजपकडून टीका, काँग्रेसकडून पलटवार

दुसरीकडे काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. नागपूरमध्ये बोलताना काँग्रेस नेते विजय वेट्टीवार म्हणाले, “आज संविधान दिवसाची आठवण काढणारे भाजपवाले प्रत्यक्षात दररोज संविधानाची पायमल्ली करतात. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर संविधान नाही, मनुस्मृती ठेवली जाते.”

वेट्टीवार यांनी भाजपवर ‘दुहेरी भूमिका’ घेतल्याचा आरोप केला असून, “आजही देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण आहे,” असे त्यांनी सांगितले.

1975 मध्ये लागू झालेली आणीबाणी ही एकीकडे देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला निर्णय होता असे काँग्रेस म्हणते, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी तो निर्णय म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्याचे म्हटले आहे. आज 50 वर्षांनंतरही हीच फाळणी जशीच्या तशी राजकारणात दिसून येते आहे.

हेही वाचा: Axiom-4 Mission Launch : भारताचा अंतराळाकडे आत्मविश्वासाने भरारी! ‘Axiom-4’ मोहिमेतून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ऐतिहासिक अंतराळयात्रा सुरू

Share