Mumbai News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; वारंवार फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, राजकीय वर्तुळात खळबळ
Mumbai News : मुंबई/ठाणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्षाचे) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.
1 min read

Mumbai News : मुंब्रा-कलवा मतदारसंघातील आमदारांना थेट लक्ष्य; पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Mumbai News : मुंबई/ठाणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्षाचे) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सातत्याने फोन करून त्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/Mumbai News
तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग"; अज्ञाताकडून फोनवर धमकीचा पाऊस
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून वारंवार फोन कॉल आले. फोन करणाऱ्या व्यक्तीने अत्यंत असभ्य भाषेत बोलत आव्हाडांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. "मी तुझ्या दारात आलोय, मला आत सोडायला सांग," असे म्हणत आरोपीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी स्वतः ट्विट करून या धमकीबद्दलची माहिती सार्वजनिक केली आहे.
पोलीस यंत्रणा सतर्क; आरोपीचा शोध घेण्यासाठी चक्र वेगाने फिरवली
एका बाजूला राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेवरून आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना, आता विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यालाच थेट धमकी मिळाल्यामुळे पोलिसांची यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या अज्ञात व्यक्तीचा कसून शोध घेतला जात असून, लवकरच याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


