Skip to content

Jayant Asgaonkar : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का; काँग्रेसचे जयंत आसगावकर पराभूत, भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा

• दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आसगावकर रेसबाहेर; 18,385 मते मिळवून भाजपचे कौतुक गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, तर सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर

V
Vivek

1 min read

Jayant Asgaonkar

•दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आसगावकर रेसबाहेर; 18,385 मते मिळवून भाजपचे कौतुक गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, तर सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर

पुणे :- पुणे शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीला अत्यंत धक्कादायक निकाल सहन करावा लागला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा उमेदवार जयंत आसगावकर यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीदरम्यान पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांना 8,965 मते मिळाल्याने ते शर्यतीतून बाहेर झाले आहेत. आसगावकरांच्या पराभवामुळे आता भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

कौस्तुभ गावडे आघाडीवर, सचिन सानप दुसऱ्या स्थानावर

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजपचे कौस्तुभ गावडे हे 18,385 मते मिळवून पहिल्या क्रमांकावर भक्कम आघाडी राखून आहेत. त्यांच्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी 11,983 मते मिळवत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर महायुतीने मुसंडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून विजयाची औपचारिकता आता केवळ वेळेची बाब उरली आहे.

हेही वाचा: Parth Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोडी; पार्थ पवारांच्या पुढाकाराने झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा

Share