Skip to content

Japan News : दक्षिण कोरियाची मक्तेदारी मोडली; भारताचा ऐतिहासिक सुवर्णवेध

Japan News : आयची-नागोया : भारतीय महिला तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी इतिहास रचला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दक्षिण कोरियाची मक्तेदारी मोडली; भारताचा ऐतिहासिक सुवर्णवेध अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोडची कमाल; महिला रिकर्व्ह सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत 5-3 ने विजय
दक्षिण कोरियाची मक्तेदारी मोडली; भारताचा ऐतिहासिक सुवर्णवेध अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोडची कमाल; महिला रिकर्व्ह सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत 5-3 ने विजय

Japan News : अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोडची कमाल; महिला रिकर्व्ह सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत 5-3 ने विजय

Japan News : आयची-नागोया : भारतीय महिला तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी इतिहास रचला. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम अनिल मोहोड या भारतीय त्रिकुटाने महिला रिकर्व्ह सांघिक प्रकाराच्या अंतिम लढतीत बलाढ्य दक्षिण कोरियाला 5-3 असे पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या प्रकारातील भारताचे हे पहिलेच आशियाई क्रीडा सुवर्णपदक ठरले.https://maharashtramirror.com/ Japan News

दक्षिण कोरियाने 1998 पासून महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारातील प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, यंदा भारतीय तिरंदाजांनी त्यांची सलग सात विजेतेपदांची मालिका खंडित केली. विशेष म्हणजे, या स्पर्धेपूर्वी भारताने महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात अंतिम फेरीही गाठली नव्हती..https://maharashtramirror.com/ Japan News

अंतिम सामना सुरुवातीपासून चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 54, तर दुसऱ्या सेटमध्ये प्रत्येकी 56 गुण मिळवल्याने लढत 2-2 अशी बरोबरीत होती. तिसऱ्या सेटमध्ये भारतीय संघाने 55-51 अशी बाजी मारत 4-2 अशी आघाडी घेतली.

चौथ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाने 54 गुण नोंदवले. भारताचेही 54 गुण निश्चित झाल्याने हा सेट बरोबरीत सुटला आणि भारताला आवश्यक एक गुण मिळाला. त्यामुळे अंतिम निकाल 5-3 असा भारताच्या बाजूने लागला आणि ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित झाले.

यापूर्वी उपांत्य फेरीत भारताने चीनचा 5-1 असा पराभव करून प्रथमच या प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यातही भारतीय तिरंदाजांनी दबावाखाली संयम राखत जागतिक विजेत्या दक्षिण कोरियाला धक्का दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share