Skip to content

Vadodara News : झिम्बाब्वेला धूळ चारत भारतीय महिला संघाची मालिका विजयाची हॅट्ट्रिक वैष्णवी शर्माची पाच बळींची कामगिरी

Vadodara News : वडोदरा : भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

झिम्बाब्वेला धूळ चारत भारतीय महिला संघाची मालिका विजयाची हॅट्ट्रिक वैष्णवी शर्माची पाच बळींची कामगिरी
झिम्बाब्वेला धूळ चारत भारतीय महिला संघाची मालिका विजयाची हॅट्ट्रिक वैष्णवी शर्माची पाच बळींची कामगिरी

Vadodara News : प्रतिका रावल आणि शेफाली वर्माच्या अर्धशतकांमुळे भारताचा आठ विकेट्सनी विजय

Vadodara News : वडोदरा : भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकत झिम्बाब्वेचा व्हाईटवॉश केला. वैष्णवी शर्माची पाच बळींची प्रभावी गोलंदाजी आणि प्रतिका रावल व शेफाली वर्माच्या नाबाद अर्धशतकांमुळे भारताने सहज विजय मिळवला.https://maharashtramirror.com/ Vadodara News

झिम्बाब्वेचा डाव १३१ धावांत आटोपला
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ ३९.५ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला. वैष्णवी शर्माने ३९ धावा देत पाच बळी घेतले. क्रांती गौड आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत झिम्बाब्वेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. झिम्बाब्वेकडून मॉडेस्टर मुपाचिक्वाने ३७, तर कर्णधार जोसेफिन न्कोमोने ३५ धावा केल्या.

प्रतिका आणि शेफालीची आक्रमक फलंदाजी
१३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या १७ षटकांत दोन विकेट्स गमावून १३३ धावा केल्या. प्रतिका रावलने ५६ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या, तर शेफाली वर्माने अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ५१ धावा ठोकल्या. दोघींच्या अर्धशतकांमुळे भारताने आठ विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीसाठी वैष्णवी शर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेत सर्वाधिक २२० धावा करणाऱ्या प्रतिका रावलला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share