Nagoya News : भारत-श्रीलंका उपांत्य सामन्यावर पावसाचे सावट
Nagoya News : नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष क्रिकेटच्या उपांत्य फेरीत गुरुवारी भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत.
1 min read

Nagoya News : सामना रद्द झाल्यास क्रमवारी ठरणार निर्णायक; भारताला थेट अंतिम फेरीत प्रवेशाची संधी

Nagoya News : नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष क्रिकेटच्या उपांत्य फेरीत गुरुवारी भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत. मात्र, नागोयातील खराब हवामान आणि पावसामुळे या सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. उपांत्यपूर्व फेरीतील चारही सामने पावसामुळे रद्द झाल्याने आता उपांत्य फेरीवरही पावसाचे सावट आहे.https://maharashtramirror.com/ Nagoya News
भारतीय संघ २० सप्टेंबर रोजी जपानमध्ये दाखल झाला. मात्र, नागोयात सातत्याने झालेल्या पावसामुळे भारतीय खेळाडूंना अपेक्षित सराव करता आलेला नाही. भारताला जपानविरुद्ध केवळ पाच षटकांचा सामना खेळण्याची संधी मिळाली. https://maharashtramirror.com/ Nagoya News
चारही उपांत्यपूर्व सामने रद्द
स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे चारही सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या संघांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला. परिणामी भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
पहिल्या उपांत्य फेरीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. दुसरी उपांत्य फेरी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे.
सामना रद्द झाला तर भारत फायनलमध्ये
भारत-श्रीलंका उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्यास आयसीसी क्रमवारी महत्त्वाची ठरणार आहे. भारत क्रमवारीत अव्वल असल्याने श्रीलंकेपेक्षा वरचे स्थान भारताला फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल.
श्रीलंका सध्या नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे खेळ होऊ न शकल्यास क्रमवारीच्या आधारे भारताला पुढे जाण्याची संधी मिळेल.
दुसऱ्या उपांत्य फेरीतही असेच समीकरण असेल. पाकिस्तान सहाव्या, तर बांगलादेश आठव्या स्थानावर असल्याने त्यांचा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
फायनलही रद्द झाली तर?
स्पर्धेचा अंतिम सामना ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्या दिवशीही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंतिम सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द झाला आणि खेळ होऊ शकला नाही, तर अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांना संयुक्तपणे सुवर्णपदक दिले जाईल. भारत-श्रीलंका उपांत्य सामना गुरुवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे मैदानावरील लढतीइतकेच नागोयातील हवामानही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.


