Skip to content

IAS Transfer : पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ; राज्य सरकारने पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Maharashtra IAS Transfer News : सांगली, पालघर, चंद्रपूर, नागपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे,मध्य प्रदेशातील अंजली रमेश हिंगोलीत तर सांगलीचे आयुक्त नागपुरात

V
Vivek

1 min read

IAS Transfer : पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ; राज्य सरकारने पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Maharashtra IAS Transfer News : सांगली, पालघर, चंद्रपूर, नागपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे,मध्य प्रदेशातील अंजली रमेश हिंगोलीत तर सांगलीचे आयुक्त नागपुरात

मुंबई :- प्रशासनातील अधिकाऱ्यांचे खांदेपालट काही थांबताना दिसत नाही.IAS Transfer News गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.आताही पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सांगली, पालघर, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे. तर मनोज रानडे यांची बदली पालघर सीईओ म्हणून करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1.बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: 2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2.मनोज रानडे (आयएएस: एससीएस: 2024) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3.शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4.अंजली रमेश. (आयएएस: आरआर: 2020) संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5.झेनिथ चंद्र देवंथुला (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Share