Pune News: खराडीतील 'हैदराबाद जायका'चा ग्राहकांच्या जीवाशी खेळ
परिसरातील या प्रसिद्ध हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थांत अतिप्रमाणात कृत्रिम रंगाचा वापर; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक इशाऱ्याला हॉटेलचालकांकडून हरताळ
3 min read

परिसरातील या प्रसिद्ध हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थांत अतिप्रमाणात कृत्रिम रंगाचा वापर; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक इशाऱ्याला हॉटेलचालकांकडून हरताळ

पुणे, धनश्री ओतारी : नफा कमावण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याचा विचार न करणे हे बेकायदेशीर आहे. पुण्यातील उपाहारगृहे आणि हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ अधिक आकर्षक आणि लालभडक दिसण्यासाठी घातक कृत्रिम रंगांचा बिनदिक्कत वापर केला जात असल्याचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील प्रसिद्ध 'हैदराबाद जायका' या हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थांत अतिप्रमाणात कृत्रिम रंगाचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेबाबत कडक पवित्रा घेतलेला असतानाही, हॉटेलचालक नियमांची बिनधास्त पायमल्ली करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. (Maharashtra mirror news)

एका स्थानिक नागरिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर 'हैदराबाद जायका' हॉटेलमधील चिकन डिशचे फोटो शेअर करत या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश केला आहे. अत्यंत गडद लाल रंगाने माखलेले चिकनचे तुकडे या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत असून, अन्नात कृत्रिम रंगांचा अतिरेक झाल्याचे उघड होत आहे. (Maharashtra mirror news)
स्थानिक नागरिकांनी केली कारवाईची मागणी
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नात, विशेषतः मांस आणि चायनीज पदार्थांमध्ये रंगांचा वापर न करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही या हॉटेल चालकांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही का? एफडीएने या निष्काळजीपणाबद्दल खराडीतील 'हैदराबाद जायका' हॉटेलवर तातडीने कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट एफडीए आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत चौकशीची मागणी केली आहे. (Maharashtra mirror news)
'सी फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेला हरताळ
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात 'सी फूड, सेफ महाराष्ट्र' ('Safe Food, Safe Maharashtra') ही धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मांसाहारी पदार्थ, चायनीज फूड आणि मिठाईमध्ये अखाद्य व घातक रसायनांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी स्वच्छतेचे आणि अन्न सुरक्षेचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. राज्यभरात शेकडो हॉटेल्सवर छापे मारून परवाने निलंबित करणे व तात्पुरते दुकान सील करण्याचे काम सुरू आहे.मात्र, प्रशासनाचा हा कारवाईचा बडगा सुरू असतानाही पुण्याच्या आयटी हब मानल्या जाणाऱ्या खराडीसारख्या भागात हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी असा थेट खेळ सुरू असल्याचे पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra mirror news)
कृत्रिम रंग मानवी शरीरासाठी संथ विष
हॉटेल्समध्ये अन्न दिसायला आकर्षक बनवण्यासाठी वापरले जाणारे सिंथेटिक आणि नॉन-परमिटेड फूड कलर्स मानवी शरीरासाठी संथ विष मानले जातात. त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात जसे ॲसिडिटी, अपचन, अल्सर आणि आतड्यांचे गंभीर संसर्ग, अंगावर पित्त उठणे, तीव्र कंड सुटणे (ॲलर्जी), यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका. लहान मुलांमध्ये मानवी वर्तन बदल आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोका यांसारखे आजार उद्भवू शकतात. (Maharashtra mirror news)
तक्रार नोंदवण्याची सोय
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कुठेही अन्नात भेसळ किंवा रंगांचा अनधिकृत वापर आढळल्यास थेट तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे: (Maharashtra mirror news)
टोल-फ्री क्रमांक: नागरिक एफडीएच्या १८०० २२२ ३६५ (1800-222-365) या टोल-फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधू शकतात.
अधिकृत एआय पोर्टल: एफडीएच्या complaints.mahafda.in या पोर्टलवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत व्हॉईस किंवा टेक्स्टद्वारे तक्रार नोंदवता येते. (Maharashtra mirror news)
बेजबाबदारपणा जिवावर बेतू शकतो
पुण्यातील खराडी, विमाननगर आणि हडपसर परिसरात नोकरदार व विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे, जे रोज बाहेरच्या अन्नावर अवलंबून असतात. अशा वेळी अन्नातील हा बेजबाबदारपणा जिवावर बेतू शकतो. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर आता एफडीएचे भरारी पथक खराडीतील 'हैदराबाद जायका' हॉटेलवर काय कायदेशीर पावले उचलणार आणि अन्न भेसळखोरांवर कसा धाक बसवणार, याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra mirror news)
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड्ससह बड्या ब्रँड्सची तपासणी
शहरातील नामांकित फूड ब्रँड्सच्या आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक मोहीम सुरू केली आहे. डॉमिनोज पिझ्झा, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉन्जिनीज यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या आस्थापनांची तपासणी करून अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक आणि तापमान नियंत्रणाची पाहणी करण्यात येत आहे.राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही अशा आस्थापनांवर एफडीएने लक्ष केंद्रीत केले आहे (Maharashtra mirror news)
महत्वाचे मुद्दे
*स्थानिक नागरिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'हैदराबाद जायका'मधील चिकन डिशचे फोटो शेअर करत केला बेजबाबदारपणाचा पर्दाफाश
*हॉटेलवर तातडीने कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
*'सी फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत मांसाहारी पदार्थ, चायनीज फूड आणि मिठाईमध्ये अखाद्य व घातक रसायनांचा वापर करण्यास सक्त मनाई
*कृत्रिम रंगांमुळे ॲसिडिटी, अपचन, अल्सर आणि आतड्यांचे गंभीर संसर्ग, अंगावर पित्त उठणे, तीव्र कंड सुटणे (ॲलर्जी), यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका


