Skip to content

HSRP Number Plate News: जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली; आता 30 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम संधी

HSRP Number Plate News: नियमानुसार कारवाई टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक

V
Vivek

1 min read

मुंबई: राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (High Security Registration Plate - HSRP) पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, वाहन मालकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता, ही मुदत आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. HSRP Number Plate Date Extended

ज्या वाहनधारकांनी अद्यापही त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी पाटी बसवलेली नाही, त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (http://transport.maharashtra.gov.in) जाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांना दिलेल्या मुदतीत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

1 डिसेंबरपासून होणार कारवाई

नवीन मुदतीनंतर, म्हणजे 1 डिसेंबर 2025 पासून, एचएसआरपी पाटी नसलेल्या किंवा त्यासाठी अपॉइंटमेंट न घेतलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई केली जाईल. मात्र, ज्या वाहनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

Share