Hingoli News : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा मृत्यू, ८ जण जखमी
Hingoli News : हिंगोली : शहरातील मारवाडी गल्ली परिसरात सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८ वाजता फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
1 min read

Hingoli News : हिंगोली : शहरातील मारवाडी गल्ली परिसरात सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री सुमारे ८ वाजता फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. फटाक्यांच्या साठ्यामुळे एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांनी परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत गंभीर भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची तीव्रता इतकी होती की, शेजारील चार ते पाच घरांनाही आगीची झळ बसली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.https://maharashtramirror.com/ Hingoli News
मारवाडी गल्ली परिसरातील गोपाल बासटवार यांच्या दुमजली घराच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला होता. बासटवार कुटुंबीयांसह घराच्या वरच्या मजल्यावर राहत होते. सोमवारी रात्री अचानक या फटाक्यांच्या साठ्याला आग लागली. काही क्षणांतच फटाक्यांचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले.https://maharashtramirror.com/ Hingoli News
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत बासटवार कुटुंबीयांसह शेजारील घरांमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बचावकार्यादरम्यान सात ते आठ जण भाजून गंभीर जखमी झाले.
आगीने घेतले रौद्ररूप
फटाक्यांच्या साठ्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. बासटवार यांच्या घरासह आजूबाजूची चार ते पाच घरेही आगीच्या विळख्यात सापडली. घटनेची माहिती मिळताच हिंगोली नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत फटाक्यांच्या गोदामातील बहुतांश साठा आगीत जळून खाक झाला होता आणि आगीच्या ज्वाळा शेजारील घरांपर्यंत पोहोचल्या होत्या.
स्फोटांमुळे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान
गोपाल बासटवार यांचे महात्मा गांधी चौकात होलसेल फटाका सेंटर असल्याची माहिती आहे. याच व्यवसायातील फटाक्यांचा मोठा साठा घराच्या तळमजल्यावर ठेवण्यात आला होता. या साठ्याला आग लागल्यानंतर फटाक्यांचे जोरदार स्फोट होऊ लागले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
दरम्यान, फटाक्यांच्या स्फोटादरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनालाही आग लागली. या आगीत अग्निशमन दलाचे संपूर्ण वाहन जळून खाक झाले. तसेच दोन अग्निशमन कर्मचारीही भाजल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, सात ते आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून, आगीमुळे परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेमुळे मारवाडी गल्ली परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


