Skip to content

Hingoli News : हिंगोलीत भूकंपाचा जोरदार धक्का; 4.5 रिश्टर स्केलची तीव्रता, नांदेडमध्येही जाणवले हादरे

Hingoli News :हिंगोली : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (3 ऑक्टोबर) सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

हिंगोलीत भूकंपाचा जोरदार धक्का; 4.5 रिश्टर स्केलची तीव्रता, नांदेडमध्येही जाणवले हादरे
हिंगोलीत भूकंपाचा जोरदार धक्का; 4.5 रिश्टर स्केलची तीव्रता, नांदेडमध्येही जाणवले हादरे

Hingoli News :हिंगोली : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (3 ऑक्टोबर) सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. सकाळी 9 वाजून 43 मिनिटांनी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपाचे धक्के हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील काही भागांतही जाणवले. https://maharashtramirror.com/ Hingoli News

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात होता. भूकंपाची जमिनीखालील खोली 5 किलोमीटर नोंदवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Hingoli News

भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांना जमिनीला हादरे जाणवले.

दरम्यान, शनिवारी सकाळी हिंगोली परिसरात भूकंपाचा हा दुसरा धक्का असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सकाळी 7 वाजून 46 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांत 4.5 तीव्रतेचा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share