Skip to content

हिंदू तरुणींवर इस्लाम परंपरा पाळण्याची सक्ती;

नागपुरातील एनजीओ प्रमुखाला अटक

PG
Prashik Ghaste

1 min read

हिंदू तरुणींवर इस्लाम परंपरा पाळण्याची सक्ती;

नागपुरातील एनजीओ प्रमुखाला अटक

नागपूर : शहरातील 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या नामांकित एनजीओमध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव आणल्या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी एनजीओचा संचालक रियाज काझी याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


तक्रारकर्त्या २३ ते २६ वयोगटातील तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज काझी हा त्यांना कामाच्या ठिकाणी नमाज पठण करणे, रोजे ठेवणे आणि एकमेकांना 'खुदा हाफिज' म्हणून अभिवादन करण्यासाठी सक्ती करत होता. तरुणींनी आपल्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात जाऊन या गोष्टी करण्यास नकार दिला, तरीही काझी सातत्याने या नियमांचा आग्रह धरत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धार्मिक सक्तीसोबतच, एका तरुणीने रियाज काझीवर अश्लील वागणूक दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या प्रकारामुळे एनजीओ क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी केवळ धार्मिक सक्तीच नव्हे, तर यामागे धर्मांतराचा मोठा कट होता का, याचाही तपास सुरू केला आहे. या एनजीओला नेमका निधी कुठून मिळतो? यापूर्वी ज्या महिलांनी काम सोडले, त्यांच्यावरही असाच दबाव होता का? या दबाव तंत्रात काझीला साथ देणारे आणखी कोणी आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत.
दुसरीकडे, रियाज काझीचे वकील मुजम्मिल हुसेन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २०२४ मध्ये हा प्रकार घडल्याचा दावा करणाऱ्या तरुणींनी या घटनेची तक्रार २०२६ मध्ये का केली आहे? यामागे राजकारण असू शकते. तसेच नमाज किंवा रोजा ठेवण्याबाबत कोणतीही सक्ती केली नसल्याचा दावाही हुसेन यांनी केला आहे.
काय आहे 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी'?
२०१० मध्ये स्थापन झालेली ही संस्था गरीब आणि झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. अनेक तरुणी या सामाजिक कार्यासाठी संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. रियाज काझीचे राजकीय वर्तुळातही संबंध असल्याचे बोलले जाते.

Hindu girls forced to follow Islamic traditions;

Share