Skip to content

Heritage Walk : पुणे महापालिकेच्यावतीने हेरिटेज वॉकचे आयोजन

येत्या ११ व १२ एप्रिल (शनिवार व रविवार ) सकाळी ७ वाजता आयोजन

DJ
Dattatraya Jadhav

1 min read

kasba ganpati
kasba ganpati

येत्या ११ व १२ एप्रिल (शनिवार व रविवार ) सकाळी ७ वाजता आयोजन

  • या हेरीटेज वॉकमध्ये पुणे शहरातील शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवार वाडा, कसबा गणपती मंदिर, लालमहाल, नानावाडा, भाऊ रंगारी निवासस्थान, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती मंदिर, भिडे वाडा, नगर वाचन मंदिर, बेलबाग मंदिर, महात्मा फुले मंडई, तुळशीबागवाले राम मंदिर, विश्रामबाग वाडा या वास्तूंविषयी माहिती देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी पुणे शहराच्या जुन्या, ऐतिहात्तिक वास्तू व वैभवाची माहिती करून घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
  • पुणे, एप्रिल ७, निलेश राऊत :
    पुणे शहराचा समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. शहराच्या या ऐतिहासिक व संस्कृतिक वारशाची ओळख नागरिकांना होण्यासाठी पुणे मनपा तर्फे ऐतिहासिक स्थळ भेट (हेरीटेज वॉक) चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर हेरीटेज येत्या दि ११ व १२ एप्रिल (शनिवार व रविवार ) सकाळी ७ वाजता होणार आहे.


    या हेरीटेज वॉकमध्ये पुणे शहरातील शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवार वाडा, कसबा गणपती मंदिर, लालमहाल, नानावाडा, भाऊ रंगारी निवासस्थान, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ गणपती मंदिर, भिडे वाडा, नगर वाचन मंदिर, बेलबाग मंदिर, महात्मा फुले मंडई, तुळशीबागवाले राम मंदिर, विश्रामबाग वाडा या वास्तूंविषयी माहिती देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी पुणे शहराच्या जुन्या, ऐतिहात्तिक वास्तू व वैभवाची माहिती करून घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
    नागरिकांसाठी सविस्तर माहिती व बुकिंग https://heritagewalk.pmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुणे मनपाचे सल्लगार अजित आपटे (९८२२३९९४६०) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

    Heritage Walk Organized by the Municipal Corporation

    Share