Skip to content

नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणार्‍याला फाशी द्या: श्रीकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पुण्यात क्लेश आंदोलन; , मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

PG
Prashik Ghaste

1 min read

नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणार्‍याला फाशी द्या: श्रीकांत पाटील

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पुण्यात क्लेश आंदोलन; , मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
  • निलेश राऊत
    पुणे: पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन येथील गुडलक चौकात क्लेश आंदोलन करण्यात आले.

    नराधम आरोपीला फाशी द्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या, अशा घोषणा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी पाटील म्हणाले, "राज्यभरातील महिला, तरुणी आणि लहान मुली सुरक्षित नसल्याचे आजवरच्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. या घटनांकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गांभिर्याने लक्ष देताना दिसत नसून ते केवळ भाषणबाजी करताना दिसतात. ही निषेधार्थ बाब आहे."

    दोन दिवसांपूर्वी नसरापूर येथे ४ वर्षाच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, राज्यातील महिला, तरुणी आणि लहान मुलींना सुरक्षा देण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    Share