Skip to content

Mumbai News : एकनाथ शिंदे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचे खळबळजनक भाष्य, टायगर श्रॉफ भेट व ठाणे पूर्णेकर प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल

Mumbai News :मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

एकनाथ शिंदे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचे खळबळजनक भाष्य, टायगर श्रॉफ भेट व ठाणे पूर्णेकर प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल
एकनाथ शिंदे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचे खळबळजनक भाष्य, टायगर श्रॉफ भेट व ठाणे पूर्णेकर प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल

Mumbai News : संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने गँगस्टरसारखे बोलू नये; राज्यपाल कारवाईची मागणी करत सदावर्तेंकडून शिंदे यांच्या भूमिकेची पाठराखण नाही तर कडक आलोचना

Mumbai News :मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे भविष्यात कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा दावा करत सदावर्तेंनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि वक्तव्यांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अभिनेता टायगर श्रॉफची घेतलेली भेट, ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण आणि गोळीबार प्रकरणावरील विधानांवरून सदावर्तेंनी शिंदेंना धारेवर धरले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

एकनाथ शिंदेनी गँगस्टरसारखे बोलू नये; राज्यपालांनी याची दखल घ्यावी

टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणाची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या विधानांवर गुणरत्न सदावर्ते चांगलेच संतापले. "एकनाथ शिंदे म्हणतात गोळीला गोळीने उत्तर देणार, पण एकनाथ शिंदे यांनी काय टोळी काढली आहे का? संवैधानिक पदावर असणारी व्यक्ती अशी गँगस्टरसारखी कशी बोलू शकते? तुमचे कायदेशीर हाल होतील, बिष्णोई गँगचा खात्मा करणार असे तुम्ही बोलू शकत नाही," असा घणाघात सदावर्तेंनी केला. जिभेला संविधानाच्या मर्यादेत ठेवून वागावे, असे सांगत त्यांनी या प्रकाराची राज्यपालांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

ठाण्यातील पूर्णेकर कुटुंबाच्या दुर्लक्षावरूनही सवाल; राजकारण तापले

एका बाजूला सेलिब्रिटींवर हल्ले झाल्यानंतर तातडीने भेटीगाठी घेतल्या जातात, मात्र ठाण्यात उबाठाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 19 दिवस उलटूनही कुटुंबीयांची साधी भेट घेतली जात नाही, यावरूनही राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. पूर्णेकर कुटुंबाच्या उपोषणाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारमधील नेत्यांच्या प्राधान्यक्रमावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या सर्व घडामोडींमुळे महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share