Skip to content

Kohlapur News : गोकुळमध्ये महायुतीची नवी राजकीय खेळी! चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?

Kohlapur News :कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

गोकुळमध्ये महायुतीची नवी राजकीय खेळी! चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
गोकुळमध्ये महायुतीची नवी राजकीय खेळी! चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?

Kohlapur News :कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. गोकुळमधील सध्याचे सत्तासमीकरण बदलण्यासाठी महायुतीने मोठी राजकीय खेळी आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गोकुळमध्ये चार शासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला असून, आज याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चार शासकीय सदस्यांपैकी शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ आणि अशोक फराटे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तर चौथ्या सदस्याच्या नावाबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे..https://maharashtramirror.com/ Kohlapur News

चार शासकीय सदस्य ठरणार सत्तेच्या चाव्या?
गोकुळमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर चार शासकीय सदस्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. या नियुक्त्यांमुळे संघातील सध्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, महायुतीला सत्तेच्या गणितात बळ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीची मागणी करणारे पत्र दिले होते. त्यांच्या या पत्रामुळे त्यावेळीही जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

गोकुळची सत्ता कोणाच्या हातात जाणार?
आता पुन्हा एकदा चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने गोकुळमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या नियुक्त्या प्रत्यक्षात झाल्यास गोकुळमधील सत्तेची गणिते बदलणार का, महायुतीला याचा फायदा होणार का आणि विद्यमान सत्ताधाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चार सदस्यांच्या नियुक्तीबाबतच्या अंतिम निर्णयाकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share