Skip to content

Ghatkopar Building Fire News : घाटकोपर परिसरात एका इमारतीला भीषण आग, 13 जण जखमी, 90 जणांना सुखरूप बाहेर काढले

Ghatkopar Building Fire Update News : घाटकोपर परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीत 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

V
Vivek

1 min read

Ghatkopar Fire News

Ghatkopar Building Fire Update News : घाटकोपर परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीत 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.

मुंबई :- घाटकोपर परिसरात एका इमारतीला आग Ghatkopar Building Fire News लागल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली.अग्निशमन दलाने सांगितले की, 90 हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेत 13 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रमाबाई आंबेडकर गृहनिर्माण संस्थेत ही आगीची घटना घडली.  Shanti Sagar Building in Ghatkopar हर्ष अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलिंद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलिंद रायगावकर, फिरोझा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन शाह, दाते आणि अमीर इक्बाल खान अशी जखमींची नावे आहेत.

एक दिवसापूर्वी मुलुंड परिसरात असलेल्या ओपल अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली होती.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Accident : ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाने पुन्हा घेतला अनेकांचा जीव, वाहनांच्या भीषण धडकेत दीड महिन्याच्या बाळासह 4 जणांचा मृत्यू

हेही वाचा: Eid e Milad Holiday : आता मुंबईत या दिवशी ईद-ए-मिलादची सुट्टी, मुस्लिम समाजाच्या मागणीवरून शिंदे सरकारची घोषणा

Share