Skip to content

Mumbai News : पेपरफुटी प्रकरणात माझा ‘संबंध नाही, बदनामी करणाऱ्यांना नोटीस देणार’ : गणेश देवरे

Mumbai News मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पेपरफुटी प्रकरणात माझा ‘संबंध नाही, बदनामी करणाऱ्यांना नोटीस देणार’ : गणेश देवरे
पेपरफुटी प्रकरणात माझा ‘संबंध नाही, बदनामी करणाऱ्यांना नोटीस देणार’ : गणेश देवरे

Mumbai News मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच विनाकारण बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशाराही देवरे यांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई विशेष शाखेच्या पथकाने गणेश देवरे यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव पाटील यांच्या घरात देवरे भाडेकरू म्हणून राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहेhttps://maharashtramirror.com/ Mumbai News
देवरे यांनी आपण गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असल्याचे मान्य केले आहे. मात्र, हा केवळ योगायोग असून पेपरफुटी प्रकरणाशी आपला दूरान्वयेही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
‘एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी दोषी नसल्याने कुठेही गेलेलो नाही. मी नंदुरबारमधील माझ्या घरीच आहे. गौरव पाटील आरोपी आहे आणि मी त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतो, यात माझा काय दोष?’ असा सवाल गणेश देवरे यांनी उपस्थित केला. आपण दोषी आढळल्यास आपल्यावरही कठोर कारवाई करावी, मात्र तथ्य नसताना बदनामी केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share