Skip to content

एकाच जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करून लाखोंची फसवणूक

पीडित महिलेने ७६ आर क्षेत्रापैकी ४० आर जमीन रीतसर खरेदी केली होती

PG
Prashik Ghaste

1 min read

एकाच जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करून लाखोंची फसवणूक

पीडित महिलेने ७६ आर क्षेत्रापैकी ४० आर जमीन रीतसर खरेदी केली होती

पिंपरी: जमिनीचा व्यवहार करून एकाच भूखंडाची दुसऱ्यांदा विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने आधीच विकलेली जमीन लपवून दुसऱ्या महिलेला विकली आणि फसवणूक केली. हा प्रकार ६ डिसेंबर २०२३ ते ७ मे २०२५ दरम्यान चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील गट क्रमांक ३४६ मधील जमिनीबाबत घडला. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. आळंदी पोलिसांनी दत्तात्रय भरत खैरे (४०, रा. आळंदी) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आरोपीकडून ७० लाख रुपये किमतीच्या जमिनीतील ७६ आर क्षेत्रापैकी ४० आर जमीन रीतसर खरेदी खताद्वारे खरेदी केली होती. मात्र, नंतर समजले की संबंधित जमीन आधीच दुसऱ्या व्यक्तीला विकली गेली होती. असे असतानाही आरोपीने ही माहिती लपवून ठेवून पुन्हा त्याच जमिनीचा सौदा केला. आरोपीने विश्वासघात आणि फसवणुकीच्या उद्देशाने बनावट पद्धतीने जमिनीचा व्यवहार केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Share