Skip to content

म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने आठ लाखांची फसवणूक

दोन महिलांवर गुन्हा दाखल

PG
Prashik Ghaste

1 min read

म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने आठ लाखांची फसवणूक

दोन महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी: म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ लाख २२ हजार रुपये घेत फ्लॅट न देता फसवणूक केल्याचा प्रकार मासुळकर कॉलनी पिंपरी येथे उघडकीस आला. हा प्रकार २९ डिसेंबर २०२२ ते ७ मे २०२६ या कालावधीत घडला.

संगीता वसंत पाटील (मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगल साळवे (रेल्वे विहार, लोणावळा), सविता सरवदे (लोणावळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेला म्हाडाच्या स्कीममध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी कडून वेळोवेळी आठ लाख २२ हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील म्हाडाचा फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.

Share