Skip to content

आरटीओचा दंड भरण्यासाठी लिंक पाठवून चार लाखाला लुबाडले

एपीके फाइल डाऊनलोड करणे पडले महागात

PG
Prashik Ghaste

1 min read

आरटीओचा दंड भरण्यासाठी लिंक पाठवून चार लाखाला लुबाडले

एपीके फाइल डाऊनलोड करणे पडले महागात

पिंपरी: आरटीओ चलन भरण्यासाठी आलेली एक लिंक किंवा एपीके फाइल डाऊनलोड करणे हिंजवडीतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हिंजवडी येथील व्यक्तीच्या बँक खात्यातून अज्ञात आरोपीने तीन लाख ९८ हजार ५०० रुपये लंपास केले. ही घटना ८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास माण, ता. मुळशी येथील बोडकेवाडी परिसरात घडली.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने १२ मे रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या विरोधात गुनहा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्‍या सुमारास अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर 'आरटीओ चलन भरण्याची एपीके फाईल' पाठवली होती. आपल्या गाडीचे कोणतेतरी चलन थकीत असावे, या समजुतीने फिर्यादीने ती फाईल डाऊनलोड केली. फाईल डाऊनलोड होताच फिर्यादीला ओटीपी आला आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ९८ हजार ५०० रुपये कापले गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Share