PUNE NEWS : हर्डीकर हॉस्पिटल ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
दोन विश्वस्तांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार
1 min read

दोन विश्वस्तांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार
पुणे, महाराष्ट्र मिरर, प्रतिनिधी : पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर (वय ९३) यांनी हर्डीकर हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहणाऱ्या सुश्रूत मेडिकल केअर अँड रिसर्च सोसायटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. त्र्यंबक दापकेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विश्वस्त डॉ. प्रचेत दापकेकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार, आरोपींनी ट्रस्टचा विश्वासघात करून बनावट कागदपत्रे तयार केली, डॉ. हर्डीकर यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून रुग्णालयाच्या परवानग्या व नोंदींमध्ये बदल केले तसेच "मॅग्नम हेल्थकेअर सोल्युशन्स" या नावाने पुणे महापालिकेच्या विविध वैद्यकीय योजनांतून निधी मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Photos · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून २०२२-२३ या कालावधीत सुमारे १.२२ कोटी रुपयांचा निधी "मॅग्नम हेल्थकेअर सोल्युशन्स" या संस्थेला वितरित करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, अशा नावाचे स्वतंत्र रुग्णालय अस्तित्वात नसल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी डॉ. हर्डीकर यांनी पोलिसांकडे केली आहे. आरोपींनी मात्र याबाबत अद्याप कोणतीही सार्वजनिक भूमिका मांडलेली नाही.
Allegations of financial misconduct in Hardikar Hospital Trust


