Fellowship News :‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ची घोषणा
पुणे, महाराष्ट्र मिरर Fellowship News : खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या सहाव्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे बुधवारी (दि.१२) सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
1 min read

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ९२ जणांची निवड करणार
पुणे, महाराष्ट्र मिरर Fellowship News : खासदार शरद पवार यांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या यंदाच्या सहाव्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे बुधवारी (दि.१२) सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या फेलोशिपसाठी ९२ जणांची निवड करण्यात येणार आहे. Fellowship News
कृषी, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्यांकडून या फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये कृषीसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर, साहित्यसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर आणि शिक्षणसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन यासह बालशिक्षण फेलोशिप देण्यात येते. फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार
शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी १२ ऑगस्ट २०२६ पासून तर कृषी, साहित्य व बालशिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर १५ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
मुख्य निवड समिती व समन्वयक
फेलोशिप निवडीसाठी तज्ज्ञांची विशेष समिती नेमण्यात आली आहे. ज्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी प्रोफेसर निलेश नलावडे, शिक्षण क्षेत्रासाठी विवेक सावंत, साहित्य क्षेत्रासाठी डॉ. करुणा गोखले तर बालशिक्षण फेलोशिपसाठी नीलेश निमकर हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पडणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
एकूण जागा आणि फेलोशिपची घोषणा
कृषीसाठी ४०, शिक्षणसाठी ३०, बालशिक्षणसाठी १० अशा एकूण ९२ गुणवंताची निवड करण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवड झालेल्यांची घोषणा १ डिसेंबर २०२६ रोजी फेलोशिपच्या वेबसाईटवर केली जाईल. १३ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे निवड झालेल्या गुणवंताना फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.


